जालना : जीवनात ह्या काही करायचे म्हटले तर मनाला मारुन कसे जमेल, त्यासाठी ह्या काहीही करा परंतू ह्या मनाला कधीही मारण्याचा प्रयत्न करु नका, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, जीवनात आपल्या जर का पुढे जायचे असेल तर ह्या मनाला मारुन कसे चालेल. म्हणूनच म्हणतो की, ह्या जीवनाला काही रंग – रुप द्यायचे असेल आणि ते पुढे जावे असे वाटत असेल तर ह्या मनाला मारु नका. परमात्म्याला जोडायचे असेल तर मनाला मारुन कसे चाललेल. ह्या आत्मामुळेच सर्व काहीही आहे. असा विचार करा. आत्म्यातूनच परमात्मा ही भेटू शकतो. ह्याच मुळें तर आपल्या मान आहे, सन्मान आहे. नाही तर काहीच नाही.
अनुभूती घ्यायची असेल तर घेऊन पाहा! जम्बूस्वामी और आचार्य सुधर्मा स्वामींचे उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत. त्यांच्यामुळेच तर आपल्या आत्म्याची अनुभूती झाली आहे. मीत्रत्वाचा भाव कोणामुळं आहे. याचा तरी विचार करायला हवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.