जालना गणेश फेस्टिवलच्या पदाधिकार्यांनी केली आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे मागणी
8 सप्टेंबर पासून जालना गणेश फेस्टिवल सुरू होणार-राजेंद्र गोरे
जालना : जालना शहरातील स्व.कल्याणराव घोगरे स्टेडियम व परीसराची स्वच्छता तातडीने करावी अशी मागणी जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज मंगळवारी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केली आहे. दरम्यान, 8 सप्टेंबर पासून जालना गणेश फेस्टिवल सुरू होणार अशी माहिती फेस्टीवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी दिली. यावेळी श्री. खांडेकर म्हणाले की, गणेश फेस्टिवल सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार असुन उद्यापासून स्वच्छता करण्यात येईल. यावेळी जालना गणेश फेस्टिवल चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, जालना फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे, माजी कार्याध्यक्ष सुरेश मुळे तसेच किरण गरड, दिनेश फलके, अशोक उबाळे, शरद देशमुख, संजय देठे, सतीश देशमुख, प्रा. राजेंद्र भोसले, रमेश गजर आदींची उपस्थिती होती.