जालना : प्रभू महावीर कसे होते, हे सांगण्यासाठी मी आलो नाही. मात्र काहींनी गैरसमज करुन घेतला आहे, असो! देवी- देवता , श्रावक- श्राविका असूनही प्रभू महावीर वेगळेच होते. कारण ते होतेच वेगळे! परंतु दुर्देवाने संत, धर्मात फरक करणारेच प्रभू महावीरांना बदनाम करु लागले आहेत, हे मुळीच बरोबर नाही, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, पुन्हा एकदा आपल्या सौभाग्याची अनुमोदना करावी. कारण वीरथुईच्या माध्यमातून आपल्याला ही यात्रा करायला भेटते आहे. मोठ्यातून मोठं तीर्थ आहे की, कोणत्या पुण्यवाणीने आपल्याला प्रभू महावीरांचे गुुणगुण मिळते आहे. अहंभाव हा मोहनिय कर्मातून येतो आणि मैत्रीभाव हा परत्मापर्यंत नेल्याशिवाय नाही. दुर्भाग्य हे आहे की, उलट करण्याचा आमचा जो काही प्रयत्न आहे तो काही केल्या बरोबर नाही. उद्या सहा तारखेला गुरु गणेशजींचा पुण्यतिथी सोहळा आहे.
म्हणून मीही त्यांना श्रध्दांजली म्हणून त्यांच्यावर तीन दिवसाची प्रवचन घेणार होतो. परंतू महावीर हेही काही वेगळे नाहीत. महावीर जोडा म्हणजे सर्व काही जुडले जाईल. परंतू आम्ही प्रभू महावीरांना विसरत चाललो आहोत. जीथे मैत्रीभाव आहे तेथे काहीही समस्या नाही. आणि मिथ्यात्व जेथे आहे, तेथे काहीही समाधान नाही, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.