जालना : श्रध्दा ही आत्म्यातून प्रगट होते तर विश्वास हा मनातून प्रगट होतो. आणि मन हे चंचल असल्याने ते केव्हा डगमेल हे सांगता येत नाही म्हणूनच श्रध्दा आणि विश्वासमध्ये खूप मोठे अंतर आहे, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, श्रध्दाही आत्म्यातून येणारी गोष्ट आहे, तर विश्वास हा मनातून येणारा असून मन हे चंचल असल्याने त्याचा काहीही भरोसा नाही, विश्वास नाही, पुढे बोलतांना ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौध्द धर्म स्वीकारण्यापूर्वी जैन धर्माचा विचार करत होते. परंतू काही कारणाने तो योग जुळून आला नाही. त्यांच्यामुळेच अनेक कामे मार्गी लागली, हेही विसरुन चालणार नाही, असे सांगून त्यांनी आपल्या धारावाहिकला प्रारंभ केला. ते म्हणाले की, चंपानगरीजवळ एक चबुतरा आणि त्यावर एक चप्पल, जो कुणी परदेशी येईल, त्याने त्या चबुतर्याला बारा जुते मारयाचे आणि त्यानंतर आत प्रवेश करायचा! याच चंपानगरीजवळ राजा आलेला आहे. तो कोणासाठी तर रामूसाठी!
त्याला जानून घ्यायचे आहे की, या चबुतर्याला बारा जुते का मारले जातात, एक बैठक बसली आणि… असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले.
यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.