जालना : प्रभू महावीर जे आहेत, जसे आहेत, तसेच ते तुम्हा-आम्हाला लाभले, हे आमचे भाग्य समजतो, वीरथिईच्या माध्यमातून जे अमृत मिळाले ते अत्भूत आहे, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, जे संसारातून उठले आहेत, ते फक्त आणि फक्त प्रभू भगवान महावीरांचे झाले आहेत. मोहनिया कर्म आम्हाला सुदूरु देत नाही. मात्र धर्म ध्यान हे गुरुत्व आकर्षणासारखी आहे. आज-काल तुम्ही धान्याचे क्लासेस लावू लागले.
परंतू मला नाही वाटत की, अशी कोणतेही क्लासेस असतील म्हणून! धर्म धान्य लावण्याचे क्लासेस असू शकतात? तर बिल्कूल नाही. परंतू तुमच्याकडे पैसे झाले असतील तर…! दिव्याला जास्त भीव हे हवेपासून असते. अशी हवा असेल तर दिवा कधीही विझू शकतो. अगर आपल्याला जास्तच गर्मी लागू लागली तर झाडांच्या सावलीत या! याच सावलीसारखं धर्म ध्यान आहे,असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.