जालना : जीवन हे वारंवार मिळण्याची गोष्ट नाही. त्यामुळेच राम, लक्ष्मण, हनुमान आणि सीता बनण्याचा प्रयत्न करा, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा. बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, जो हमने किस को दिये है, वो गम हमे तो लेने पडगे ॥ या गिताने त्यांनी आपल्या धारावाहिकची सुरुवात केली. ते म्हणाले की, मध्यप्रदेशातील उजैन्ननगरीत एक राजा राहत होता. तो प्रजेचे काळजी घेणारा होता. त्याच्या हाताखाली एक नोकर होता. रामू! रामूचं लग्न पाच महिन्यावर आलं होतं. रामू त्या राजाला म्हणाला. जैसे हमारे पिताजी नही, वैसेही हमारी जो गुलाबो है ना उसके भी पिताजी नही! ये जो शादी हैना वो उसके चाजीचा कर है! त्यावर राजा नरेंद्रजी म्हणाले, तो क्या हूआ। हम भी तेरे शादी करेंगे, रामू की शादी होई गयी। पर जस आपल्याकडे असतं, तसचं त्याचं झालं. ज्यातर आपला दिमागही शादी के बादही जादा चलती है । लग्नानंतर पत्नी म्हणाली, वो मेरे बुध्दु! मेरे पास एक आयडी है। आपको उनके साथ जाने की जरुत नही पडेगी! ना आपके सेठजी कुछ बोलगे ना आपको उनके साथ जाना पडेगा। बस उनको एकही बोलना की, आपण रस्त्याने चाललो की, मी ज्या- ज्या प्रश्नाची उत्तरे विचारील त्या- त्या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील. आणि जेथे तुम्ही निरुत्तर व्हाल तेथून मी वापस येईल. राजा रामूच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार झाला. चप्पानगरी आली. जसंही रामू प्रवेश करु लागला तसंच तेथील शिपाई ओरडला. रामू काय पाहतो तर एक चबुतरा आणि त्यावर एक चप्पल ठेवलेली. जो कुणी येईल, त्याने त्या चबुतर्याला बारा जुते मारायचे आणि आत प्रवेश करायचा. रामूने त्या शिपायाला विचारले असे का करायचे. त्यावर तो शिपाई म्हणाला, माहित नाही. रामू सरळ त्या राजाकडे आला. आणि घडलेली हकीगत सांगू लागला. राजा मागे पुढे न पाहता तोही त्या ठिकाणी पोहचला.असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रयचनाची सांगता केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.