जालना: भगवान कधीही आदेश देत नाहीत, आदेश द्यायचे काम अधिकार्यांचे असते. म्हणुन ते कधीही आदेश देत नाहीत. तर ते केवळ उपदेश देत असतात. असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधनेच्या अध्यायातील प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, एक भूमिका असते. तशीच ती प्रभूंची राहली आहे. शादी और दिक्षा ह्या सारख्याच आहेत. परंतू एकात मुक्ती आहे. वैराग्य आहे. परंतू लग्नाचे तसे नाही. ये जो शादी करते तो सेवा हो! साधू मे आनंद कब आयेगा। जब वैराग्य आयेगा तब। कोई नियंत्रण ना हो। कसी के अनुशासन में कोई भी रहाना नही चाहता।
ऑख खुलती है दुनिया नजर आती है, और ऑख बंद हो जाती ंहै, तो हमे भगवान नजर आते हैे। असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.