जालना : फुकट-मोफत मिळणार्या कोणत्याही गोष्टींची किंमत राहत नाही. परंतू आम्ही आपल्याकडून कसलीही किंमत न घेता जीनवाणी ऐकवत आहोत. त्यामुळे खरे भाग्यशाली तर आपण आहात,असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधनेच्या अध्यायातील प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, त्या बैलासारखी गत आमची आहे. एकवेळ तो बैल जाऊन एका खड्ड्यात पडला. समोरच्याचा टांगा त्यात फसला. आता तुम्हीच सांगा कोणत्या मालकाला असा बैल कुणाला आवडेल? कुणालाच नाही ना! परंतू आम्ही बी नशिबवान आहोत, असेच म्हणायला हवे. कारण आम्हाला चांगले शिष्य मिळाले. फुकट-मोफत मिळणार्या कोणत्याही गोष्टींची किंमत राहत नाही. परंतू आम्ही आपल्याकडून कसलीही किंमत न घेता जीनवाणी ऐकवत आहोत. त्यामुळे खरे भाग्यशाली तर आपण आहात, असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात राम नाम के हिरे मोती, हे सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.