जालना : प्रभू महावीर आज प्रत्येकाच्या जीभेवर आहेत. परंतू ते आमच्या जीवनात आहेतच, असे नाही म्हणूनच म्हटले आहे की, भगवान महावीर हे आमच्या जीवनात सुध्दा असायला हवेत, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, आत्मा अगर नसती तर दुकान नसती, आणि भगवान परत्माही नसता. आमच्या तुमच्यात आत्मा नसती तर काय झाले असते हे माहित नाही. मात्र आत्मा आहे म्हणून परमात्मा आहे. वीरत्थुई कमालची आहे. मैत्रीभाव असल्याशिवाय जैनत्व नाही. दिगंबर, श्रेश्वांतांबर काहीही नाही. केवळ मैत्रीभाव ठेवावाच लागेल.
यथा नाम तथा वो, म्हणजेच हे कशाचे संबोधन आहे! तर प्रभू महावीर हे आमचे यथा योग्य आहेतच. त्यांचे अनेक नावे आहेत. परंतू ते ओळखले जातात केवळ महावीर नावानेच! असे सांगून त्यांनी आज बाराव्या गाथ्यावर विवेचन केले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.