जालना : जम्बू स्वामी सारखा शिष्य असावा, सुधर्मा स्वामी म्हणजेच भगवान महावीरांचे रुप आहे. जम्बू स्वामी आणि सुधर्मा स्वामी नसते तर आम्हाला आगम मिळालेच नसते.
गुरुंमध्ये असलेले आपल्याला हवे असेल तर तशी तपश्चर्या असायला हवी. प्रभू महावीरांचा दृष्टीकोन कसा होता? असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, घर, दुकानाची आठवण आली नाही तरच आपण बोर होणार नाहीत, असे सांगून ते म्हणाले की, कुंभकर्ण हा वारल्यानंतरची गोष्ट आहे. त्याच्या पत्नीचे नाव होते, निद्रादेवी! नोटा मोजतांना कुणीही झोपत नाही. मात्र इथे ! ये पल अनमोल है।
यावेळी त्यांनी साबणाचेही उदाहरण दिले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, संवाद आणि विवाद! संवाद हा समक्यदर्शी है! तो विवाद हा मैत्रीदर्शी! जेव्हा तुम्ही मला पाहाल तेव्हा मी तुमचाच आहे, असे नजरेस येईल आणि मलाही तुम्ही आपलेच नजरेस याल, हा झाला संवाद !
कौरव आणि पांडवाचं ज्यावेळी युध्द झालं. त्यावेळीही असेच घडले. श्रीकृष्ण म्हणाले की, एकीकडून मी आहे,तर दुसरीकडे माझे सेना! आणि मी ज्यांच्या सोबत राहिलं, पण लढणार नाही. दुर्योधनाने सेनेचा स्वीकार केला, आणि अर्जुनाने श्रीकृष्णाचा ! अर्थात या ठिकाणीही आपल्याला सम्यक दृष्टीस पडेल. कारण दुर्योधन हा मनोमन त्यावेळी म्हणाला की, मी याला घेऊन काय करु! त्यावेळी अर्जुनाच्या डोळ्यातून पाणी आले! का तर तो म्हणाला,बरं झालं दुर्योधनाने तुम्हाला मागितले नाही.
हा फरक अर्जुन आणि दुर्योधनाचा असला तरी दुर्योधन हा मिथ्यात्व दर्शी ठरला तर अर्जुन हा सम्यकदर्शी ठरला, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.