जालना : पूर्वी शाळेत सर्व मुले एकत्रीत बसत होती. त्याठिकाणी मग कुणी ब्राम्हण असेल तर कुणी, वैष्णव, तर कुणी अन्य कुणी! मी पन्नास वर्षाची जिंदगी पाहिली. पण आता! काय झाले आम्हाला! पुण्य शक्ती देत असेल परंतू धर्म आम्हाला सहनशक्ती देतो, यातच सर्व काही आले, असे प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात प.पू. रमणीकमुनीजी म.सा. बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना प.पू.रमणीकमुनीजी म. सा. यांनी यावेळी विविध उदाहरणे देखील दिली. पुढे बोलतांना ते म्हणाले की,आपण ठरवायला पाहिजे की, पुण्य हवे की, सहनशक्ती! पुण्य केल्याने आपल्याजवळ धन- दौलत येईल परंतू ते सांभाळण्यासाठी आपल्याला धर्माची गरज आहे की, नाही! पूर्वी मोठ्यांचा मान- सन्मान राखला जायचा. ते जे म्हणतील त्यावर कुणीही विचार करत नव्हते. ते सांगतील आणि म्हणतील ती पूर्व दिशा असायची. परंतू मध्यतरी त्यावरही विचार होऊ लागला. ते जे सांगतात ते खरोखरच बरोबर आहे का? आता तर तोंडावरच नाही म्हणण्याची पध्दत आली आहे. मंदिरं वाढली, सभा स्थान वाढले तसेच सामाईक करणार्यांची संख्या वाढली. पण…! अशा सामाईकचं फळं खरच मिळेल का? हा खरा प्रश्न आहे. परिवार फुटू लागले. जावा- जावा एका छताखाली तर राहतात पण बोलतात त्या! एकमेकीचं तोंड पाहणंही पसंत करत नाही. पूर्वीचा जेजही आपल्याकडे पाहून आणि आपल्या साक्षीवर निर्णय देत असे, परंतू आता तर आपलीच संख्या न्यायालयात जास्त आहे, यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील प.पू.श्रमण संघ,रमणीकमुनीजी म. सा. यांनी दिली. त्यांनी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रयचनाची सांगता केली.
यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.