जालना : ध्याना काही पैसे लागत नाहीत, तेही अत्भूत आहे, प्रत्येकानेच ध्यान मग्न राहयाला हरकत नाही, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, ध्यान म्हणजेच धर्म कार्य आहे, जे ध्यान करतात ते सुध्दा धर्मकार्य करतात, असे म्हटले तर ते मुळीच वावगे ठरणारे नाही. ध्यानाचेही दोन प्रकार आहेत, असे सांगून ते म्हणाले की, ज्यावेळी आपल्याला खूप गर्मीचा त्रास होऊ लागतो. तेव्हा आपण एखाद्या झाडाचा आसरा घ्यायला लागतो. दिवा जेव्हा विझू लागतो, तेव्हा तो विझू नये म्हणून आपणच अंधार्या खोलीचा आसरा घेतो. अशा खोलीत जेव्हा दिवा असतो, त्यावेळी तो हालत नाही, डुलत नाही अगदी सरळपणे त्याची ज्योत असते. ध्यान तरी दुसरे काय आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. यावेळी त्यांनी शिक्षक दिनाच्या शिक्षकांना शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.