जालना : प्रकाश कटेल तर अंधकार येईल, अगदी त्याचप्रमाणे कसायभाव जसा-जसा कमी होत जाईल,तीतकाच मैत्रीभाव वाढेल. आणि मैत्रीभाव वाढला की आपण प्रभूंच्या जवळ जाऊ,
असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, आपल्या घरातील प्रकाश कधीही कमी करत जाऊ नका. आज-काल तर घरांमध्ये जेव्हढा प्रकाश कमी तेव्हढी झोप आपल्याला लागते. परंतू प्रकाश कधीही कमी करत जाऊ नका. संसारी सुख हे मनाचा आहे. दुसरे काय? आपल्याला जर का आत्म्याजवळ पोहचायचे असेल तर कसाय भाव कमी करा आणि मैत्रीभाव आपोआप वाढत जाईल. मैत्रीभाव वाढला की, आपण आत्म्याजवळही पोहचू आणि प्रभूजवळही! मैत्रीभावात जी ताकद आहे, ती कशातही नाही. त्यासाठी कसायभाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
भगवान महावीरांनीच सांगीतले आहे की मैत्रीभाव वाढवल तर तुम्ही एक दिवस महावीर बनाल! ते म्हणाले नाही की, तुम्ही श्रावक- श्राविका आहात, तर श्रावक- श्राविकाच राहा! करुणा ठेवा!! कल्याण करुणा सोबत जोडला आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.