जालना : माणसाने आपल्या मुळाला कधीच विसरले नाही पाहिेजे. कारण जो मनुष्य आपल्या मुळाला विसरतोे तो जैन आहे, वाटत नाही, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, काल राष्ट्रीय सण होता तर आज श्रीकृष्ण जन्माष्टी म्हणजे धार्मिक सण आहे. हमारे जैन परंपरांमें ये त्योहार मनाया जाता है, असे सांगून ते म्हणाले की, जेल और जंगल से जिनकी सुरुवात हुई है, उनका जीवन कैसा रहा होगा, जेलमध्ये जन्म तर शेवट हा जंगलात झाला. त्यांचं मधलं जीवन कसे असेल? हे तुम्ही आम्ही जाणलं पाहिजे. जिसके जन्म से पहिले ही मृत्यू का वारंट निकाला होगा। ये वारंट किसने निकाला वो भी उनका मामा है। आज त्यांनी श्रीकृष्ण जन्मावर बरेच काही सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.