जालना: भगवान प्रभूंना आम्ही मानतो. परंतू अखेर आम्ही कोणाचे तरी गुलाम आहोत. काय आम्ही कानाचे गुलाम आहोत की आम्ही मनाचे गुलाम आहोत, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधनेच्या अध्यायातील प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, जीवन धन्य बनेल, असे कार्य आपल्या हातून व्हायला पाहिजे. अन्यथा ते कार्य न केलेलेच बरे! जेंव्हा आपल्याला मरणाचे बोलावणे येईल तेव्हा काय होईल. व्यक्ती जागतो परंतू केव्हा जागतो. ते पाहणेही गरजेचे आहे. आत्मा जेव्हा जागृत होईल तेव्हा मात्र हे जीवन धन्य झाले म्हणून समजा।
स्वार्थाची पुर्ती करणाराच आपल्याला भावतो, गोड वाटतो. परंतू कधी तरी त्या आत्म्याचा विचार आपल्या मनात आला का? हा खरा प्रश्न आहे, मी तुम्हाला खरे तर भगवान महावीरांना जोडले जावेत म्हणून येथे आलो आहोत. इच्छा ही अशी वस्तू आहे की, ती केव्हाही पूर्ण होत नाही, असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.