Share This Post

Featured News / Featured Slider / Khabar

851 रक्तदात्यांचा सहभाग

851 रक्तदात्यांचा सहभाग

*औंध बाणेर बालेवाडी पाषाण पिंपळे निलख जैन सकल संघ (ABBPPJSS) आणि ऋषभदेव फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन! 851 रक्तदात्यांचा सहभाग!*।

भगवान महावीर जन्मकल्याणक, श्रीरामनवमी, आणि जागतिक आरोग्यदिन या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून मानवतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेल्या औंध बाणेर बालेवाडी पाषाण पिंपळे निलख जैन सकल संघ (ABBPPJSS) आणि ऋषभदेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २९ मार्च २६ रोजी बाणेर येथील माऊली गार्डन येथे दुसऱ्या मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक श्री सनीजी निम्हण यांच्या हस्ते पार पडले. सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान झालेल्या या शिबिरामध्ये सर्व धर्माच्या नागरिकांनी उस्त्फुर्तपणे प्रतिसाद देत, ८५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून लक्षणीय प्रतिसाद दिला. याबद्दल रक्तदान शिबिराचे मुख्य संयोजक सुनीलजी नहार व सचिनजी नहार यांनी रक्तदात्यांच्या उतस्फुर्त प्रतिसादा बद्दल आनंद व समाधान व्यक्त केले.

या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी ऋषभदेव फाउंडेशन आणि ABBPPJSS सचिनजी नहार, रमणलालजी लुंकड यांच्यासह, भरत बोरा, नितीन बांठिया, अमित कुदळे, संतोष शिंगवी, परेश गुगळे, आनंद कांकरिया, अमित संचेती , दिपेश भटेवरा, स्वाती नहार, राजश्री बोरा , सपना जैन, सारिका ओसवाल, पूजा भटेवरा , योगिता झांबड, सरला जैन, पारस कटारिया, राहुल छाजेड, धीरज कोठारी, आदित्य गादिया व सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

*प्रोत्साहन* : अनेक तरुण आणि महिलांनी प्रथमच रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.

*सुयोग्य नियोजन* : सकाळपासूनच रक्तदात्यांच्या रांगा लागल्या होत्या. शिबिराच्या ठिकाणी स्वच्छता, अल्पोपहार आणि प्रमाणपत्र वाटपाचे चोख नियोजन करण्यात आले होते.

*विशेष आभार* : श्री गौतम नाबरीया हे गौतम लब्धी फाउंडेशनचे अनुभवी कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर गेल्या 25 वर्षांपासून ते रक्तदान शिबिरांसाठी पुण्यातील सर्व रक्तपेढ्यांसोबत कार्यरत आहेत. त्यांच्या याच दांडग्या अनुभवाने याही वर्षी शिबिराच्या यशामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

या शिबीरास आकुर्डी- निगडी प्राधिकरण श्री संघाचे पुर्वाध्यक्ष व जेष्ठ सामाज सेवी सुभाषजी ललवाणी यांनी आयोजनाचे कुतुहुल जाणण्यासाठी सदिच्छा भेट दिली. आपल्या मनोगतात सुभाषजींनी सुंदर आयोजन, नियोजन व प्रयोजनाबद्दल आयोजकांच कौतुक केल व भरभरुन शुभेच्छा दिल्या . अनेक रक्तदान शिबीर आयोजन करणार्या आदिनाथ महावीर प्रतिष्ठान, पुष्पमंगल मंडळांनी आयोजन नियोजन पाहण्यासाठी भेट दिली.रक्तदान हे जीवनदान या उक्तीप्रमाणे दरवर्षी ABBPPJSS सकल संघाने मेगा ब्लड बॅंक ही संकल्पना निरंतर चालु ठेवावी असे आवाहन श्री ललवाणी यांनी केले व. सुनीलजी व सचिनजी नहार व सर्व युवा सांथींना धन्यवाद दिलेत.

या शिबिराप्रसंगी श्री विलासजी राठोड – अध्यक्ष पुणे जिल्हा सकल जैन संघ, श्री इंद्रकुमारजी छाजेड – चेअरमन जितो पुणे, श्री लक्ष्मीकांतजी खाबिया – सेक्रेटरी जितो पुणे, श्री अभयजी छाजेड – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस, श्री सुभाषजी ललवाणी, श्री रवीजी जैन, श्री राजेंद्रजी मुथा, श्री आनंदजी छाजेड, श्री सागरजी सांखला, श्री नितिनजी संकलेचा, श्री महावीरजी नहार, श्री नितीनजी बेदमुथा, श्री राजेंद्रजी मुनोत, श्री देवेंन्द्र जी लुंकड, श्री रमेशजी कटारिया, गौतम निधी सेंट्रल कमिटीचे सर्व पदाधिकारी, तसेच या भागातील नगरसेवक श्री सनीजी निम्हण, सौ सपना छाजेड, सौ भक्ति गायकवाड, श्री परशुराम वाडेकर, श्री अमोलजी बालवडकर, श्री बाबुराव चांदेरे, सौ रोहिणी चिमटे, सौ मयूरी कोकाटे, तसेच राहूल बालवडकर, मनोज बालवडकर यांचीही उल्लेखनीय उपस्थिती होती.

*आयोजकांचे मत* : “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा झालेली वाढ ही लोकांच्या वाढत्या जागरूकतेचे प्रतीक आहे. ८५१ बाटल्या रक्त संकलित करून आम्ही केवळ आकडा गाठला नाही, तर शेकडो रुग्णांना जीवनदान देण्यासाठी हातभार लावला आहे,” असे मत आयोजकांनी व्यक्त केले. या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी ऋषभदेव फाउंडेशन आणि ABBPPJSS चे सचिनजी नहार यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar