जालना : या दिलाला तुझ्याशिवाय काहीच नको आहे. हे प्रभू तुझ्या आठवणीतच हा देह पडून राहून दे, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, गुरु हेच प्रभू भगवानजवळ पोहचू शकतात. अन्य कुणीही नाही. म्हणूनच हे प्रभू तुझ्या आठवणीतच हा देह पडून राहून दे, देवाचे आणि भक्तांचे वर्गीकरण केवळ- केवळ प्रभू भगवंतच करु शकतात. जहॉ देव क्रिडेत असतात, तेव्हा मात्र इंद्रीयांचं वागणं वेगळं असू शकतं. श्रृत आराधना कशाला म्हणायचं? आप अगर घर पें ले जा सकते है। गावोगे, गवायेगे तो आपका घर आनंदमय होगा। अपने आप को यहा आना जरुरी है।
लगातर 48 घंटो तक प्रभू भगवंत महावीर बोलते रहे। इतनी जानकारी दि की, पुछने काम नही, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. यावेळी त्यांनी शिक्षक दिनाच्या शिक्षकांना शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.