जालना : साखरेचा गुणधर्म हा मिसळणे हा तर दगडाचा बुडणे आणि नदीचा गुणधर्म मिसळणे हा असला तरी ती आपले अस्तित्व दाखवून देत नाही तर साखर ही आपला स्वभाव, गुण दाखवून देते, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, श्रध्दा ही असायलाच हवी. आपले अनेक जण अंबानी होण्याचं स्वप्न पाहत असतील पण आपण श्रध्दावान का बनण्याचं स्वप्न पाहत नाही. मगरमच्छही पाण्यातच राहते आणि हंसही पाण्यातच राहतो. पण दोघात खूप अंतर आहे. हंस हा पाण्यात मोती टाकतो. मग आम्ही देखील हंस बनण्याचं स्वप्न का पाहू शकत नाही. दगड हा पाण्यात पडतो तर दुधात साखर ही दुधात मिसळते. तर नदीचा गुणधर्म हा आहे की, ती समुद्रात मिसळते. परंतू साखरेतही कमी आहे. की, ती आपल्या उपस्थितीची जाणीव करुन देते.तसे नदीचे नाही पूर्णपणे समुद्रात विलीन होऊन जाते. जो पतीचं गोत्र आहे तेच पत्नीचं ही आहे. करो या ना करो उनकी मर्जी म्हणून पत्नीलाच धर्म पत्नी म्हटलं जातं. तर पत्नीला गृहलक्ष्मीही म्हटल्या जातं. मग भलेही ते कमावत असू द्या पण गृहलक्ष्मीचं तर पत्नीलाच म्हटलं जातं, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली.
त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.