जालना : अंहकार हा असा प्राणी आहे की, तो ना कुणाला जगू देत ना कोणाला मरु देत म्हणूनच आपण सातत्याने श्रृत आराधना करा, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, कर्ता आणि करविता तो आहे. म्हणूनच आपण आहोत. तो जर नसेल तर काय झाले असते. हेही तुम्हीही सांगू शकला नसता आणि आम्ही देखील! परंतू भगवंत प्रभूंची महान लिला आहे की, आपण सर्व जण त्यांची आराधना करत आहोत. म्हणूनच परत्म्यानेही म्हटले की, श्रृत आराधना करा, स्वाध्याय करण्यापेक्षा श्रृत आराधना केव्हाही चांगली! स्वाध्याय काळातच स्वाध्याय केला पाहिजे. श्रृत आराधना वेगळे आणि स्वाध्याय वेगळा! कोणत्याही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी केलेला स्वाध्याय! श्र्रृत आराधना म्हणजे धर्म आणि स्वाध्याय म्हणजे काय? भोजन म्हणजे जेवढे पोटाला लागेल तेवढेच खावे आणि जास्त खाल्ले तर…. म्हणजे भोजन हे आपले स्वास्थ राखले जाते आणि बीघडणेही त्याच्याच हातात आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.