जालना : विचार आणि संस्कारी असलोत तरच प्रभूंजवळ जाऊ शकतो, अन्यथा नाही. असे मन आपले लावा की, प्रभूंना आपल्याजवळ आल्याशिवाय पर्यायच राहणार नाही, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधना या विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, हे अंग असे आहे की, परम् दुर्लभ आहे. माणसांच्या आतमध्ये आत्मीयता पाहिजे, तीच मोठी देणगी आहे. जिसमें आत्मीयता होगी वों धर्म से कभी- भी भागेगें नही! जब ऊसे धर्मभाव वाढीस लागल्याशिवाय राहत नाही. धर्म श्रवण करना भी जरुरी ंहै। जो खुद सुन नही रहा हो। वो धर्म क्या बढेगा। श्रध्दा जरुरी आहे, त्याग आणि दान की भावना जेव्हा येईल तेंव्ंव्हाच आपली श्रध्दा बळकट होईल. हा मार्ग आत्मा आणि परमात्मा के पास जाता है। जीवन धन्य कधी होईल, जेव्हा आपण प्रभूंशी जोडल्या जाऊ, आज का दिन कैसा हो सोने सें महंगा हो। ऐसा आपुन बोलते हो ना, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.