राष्ट्रसंत आचार्य सम्राट पु. आनंद ऋषिजींच्या 33 व्या स्म्रुति दिना प्रित्यर्थ 330 गरजूंना अन्नदान! आज राष्ट्रसंत आचार्य सम्राट पु. आनंद ऋषिजी म.सा. यांच्या 33 व्या स्म्रुति दिनाचे औचित्य साधत “ आनंद की रोटी” या आकुर्डी- निगडी- प्राधिकरण स्थित समुहा तर्फे श्री मोतीलाल स्मितलकुमार चोरडीया परिवारातर्फे 330 गरजूंना YCM हॉस्पिटल परिसरात अन्नदान करण्यात आले. आज अन्नदान वाटपाची सुरुवात आकु्र्डी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषजी ललवाणी यांच्या मंगल पठणाने झाली.
आजपर्यंत या समुहाने 150 वेळा अन्नदान केले. उपप्रवर्तिनी पु. सुमनप्रभाजी म.सा. व दक्षिण चंद्रिका पु. संय्यम लताजी म.सा. यांच्या प्रेरणेने सुरु झालेला उपक्रम अखंडित चालु आहे. “ आनंद- रोटी” परिवाराचे श्री विक्रम छाजेड, जवाहर मुथा, नेनसुख मांडोत , राजेंन्द्र कटारिया, विजय गांधी, मोतीलाल चोरडीया, राजेंन्द्र छाजेड , अशोक नहार, सुर्यकांत मुथीयान, विजय नहार नियमीत रुपाने सेवा देण्याचे कार्य करतात. अनेक परिवारांच्या वतीने किंवा आनंद रोटी परिवाराच्या वतीने अन्नदानाचा उपक्रम सुरु असतो. आज अन्नदान श्री सुभाषजी ललवाणी, विक्रमजी छाजेड, जवाहर जी मुथा, मोतीलालजी चोरडीया, नेनसुख जी मांडोत, अशोकजी नहार रमेश मांडवकर, रामदास वालाटे ,यांचे शुभहस्ते करण्यात आले.