जालना : प्रभू पर्यंत आम्हाला कोण जाऊ देत नसेल ते अज्ञान आहे! मनुष्याला अज्ञान कधीही पुढे जाऊ देत नाही, आम्हाला प्रभूंची आठवण आणि संसाराशी जवळीकही साधू देत नाही, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, सर्व समस्यांचे मुळ हे अज्ञानात आहे. परमपिता परत्मा प्रभू महावीरांपासून आम्हाला कोण दूर लोटत असेल तर ते अज्ञान आहे. म्हणूनच या अज्ञानाला आम्ही घालवले पाहिजे. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे. परंतू प्रभूंना कसलीही मर्यादा नाही. प्रभूंना कसलीही सिमा नाही.
समुद्रालाही पण तळ आहे. परंतू प्रभूंचे ज्ञान हे अत्भूत आहे, बोलण्यालाही एक सीमा आहे पण प्रभूंना कसलीही सिमा नाही, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.