जालना : आपको भगवान महावीर का अनुभव करना है। भगवान महावीर केवळ अनुभव घेण्यासाठी नाही तर ते आम्हाला जी देसना देतात, लगात्तार बोलण्याच सामार्ध्य कोणात आहे. हे सामार्ध्य केवळ आणि केवळ भगवान महावीरांमध्येच आहे, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, आपण आपल्या कपड्यांना सुंदर ठेवण्याची विधी जाणता, तण की सफाई ठेत्तण्याचं तंत्र आपल्याकडे आहे. तर मग भगवान महावीरांनाच का आम्ही दूर करतो. त्यांनाही जवळ करा, सुंदर करा, आपण आपलं खरं अहोभाग्य भाग्य समजलं की चातुर्मास आणि प्रभू भगवान महावीरांचं चरित्र ऐकायला मिळत आहे. आता 27 दिवसाचा श्रृत्त आराधना येत आहे.
त्यात आपल्याला बरेच काही शिकायला मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. यावेळी त्यांनी शिक्षक दिनाच्या शिक्षकांना शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.