जालना : भगवान प्रभूंना ओळखा आणि त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न करा, तरच आपल्या सर्व दु:खाचे हरण होईल, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधनेच्या अध्यायातील प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, कशाय काम हेच असतं की, त्याला कुणीही एकत्र पाहवले जात नाही. म्हणूनच म्हटले आहे, कशाय हे वाटण्याकरण्याचं काम करतात. त्यांस कुणीही चांगलं म्हणतं नाहीत. परंतू त्यांच्या शिवाय आपलं काही चालंतंही नाही.
म्हणूनच तर आज जे काही परिवार वाद चालू आहेत. त्याचे कारणच कशाय हे आहे. गोडी मिटली तर आमची भूकही मिटेल, परंतू त्याने काय होणार! चाह मिटली तरच आमची चिंता मिटेल. परंतू त्यासाठी चाह मिटायला हवी ना! ज्यांनी भगवान रामांना सोडून दिले, ते स्वत: डुबलेले आपण पाहिले आहेत.
आपण दु:खी का आहोत तर यास आपलं भाग्य नाही तर अज्ञान कारणीभूत आहे, म्हशणूनच म्हणतो की, प्रभूंना ओळखा आणि त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न करा, तरच आपल्या सर्व दु:खाचे हरण होईलअसेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.