जालना : निंदा कोणाचीही करु नका. आपल्याकडे कितीही दौलत असू द्या, आपल्याकडे कितीही सुंगधांच्या बाटल्या असू द्या. मात्र पाण्यानेच तहान भागते. आणि भूका व्यक्ती हॉटेलचं धुंडाळतो, म्हणूनच कोणाचीही निंदा करु नका, निंदा करण्यापासून हमेशा दूर रहा, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, आज आपण 39 भागाचा अभ्यास करणार आहोत, असे सांगून ते म्हणाले की,
जिवनात असे काही बोल आहेत की, जे मनुष्याला दूर करतात. काही बोल असेही आहेत की, दूरच्याला जवळ करतात. पाणीही आपल्याकडेच आहे, आगही आपल्याकडेच आहे. एखाद्याला शिवी द्याल तर तोही आपल्याला शिवी देईल. परंतू काही जण या शिवीलाच गीतातही बदलात. आपल्या संबंध ह्या वाणीशी जोडलेला आहे. आणि आम्ही साधू- संत जीनवाणीशी जोडलेला आहे.
त्यामुळेच ह्या वाणीचा उपयोग चांगल्यासाठीच करावा. का कोणाचा अपमान करायचा, कोणाची निंदा करायची! असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. यावेळी त्यांनी शिक्षक दिनाच्या शिक्षकांना शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.