जालना : ज्याप्रमाणे राधेशिवाय कृष्ण अधुरे आहेत, मासा हा पाण्यात मोती सोडतो तर गौतम स्वामी आणि भगवान महावीर, जम्बोस्वामी आणि सुधधर्मा स्वामी हे जसे एकमेकांशिवाय अधुरे आहेत. तसंच धर्म सुध्दा हा शरीराशिवाय अधुराचं आहे, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, व्याख्यात्याबिना श्रोता जसा अधुरा आहे, त्याचप्रमाणे धर्माचेही आहे. आत्म्याशिवाय शरीर आणि शरीराशिवाय आत्मा जसा अधुरा आहे. त्याचप्रमाणे धर्माचेही आहे. कुठे ना कुठे तरी याचे कनेक्शन निश्चितच आहे. हे सर्व जण एकमेकांशिवाय अधुरे आहेत. हे काही तरी आहे. सुधर्मा स्वामींचे 27 गाधा आहेत. आणि जम्बो स्वामींच्या केवळ दोन गाथा आहेत. परंतू या दोन गाथापैकी एकात केवळ प्रश्न आहेत.
सवाल में जान है! प्रश्न छोटा असू शकतो, पण उत्तराची काहीही सिमा नाही. माझे महावीर कसे आहेत? वो ज्योत कैसी? वो प्रदीप कैसा? भगवान हे आपल्या श्वासाचे मालिक आहेत, जय जिनेंद्र, आत्मदर्शी, खेदक, क्षेत्रग्य, चराचर, आदी शब्दांचाही अर्थ यावेळी सांगितला. असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.