जालना : दोषाने मनुष्यातील अंतर वाढत जाते तर गुणांमुळे हेच अंतर कमी होते, म्हणूनच अगोदर दोष- गुणांचा विचार प्रत्येकानेच करायला हवा, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, 27 दिवसांची श्रृत आराधना लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या आराधनेतूनच आपल्याला प्रभू महावीरांचे यथासांग दर्शन घडणार आहे. म्हणून तुम्हाला जेवढा आराम करायचा तेव्हढा तो करुन घ्या. ही आराधना केवळ टीव्ही किंवा मोबाईलवर ऐकावयाची नसून येथे येऊन तिचा आनंद घ्या, दिपावलीपूर्वी म्हणजेच पाडव्या दिवशीच प्रभू महावीरांनी 48 घंटे लगातार बोलले आहेत. त्यानंतर त्यांनी आपला देह ठेवला. दोषसे दूरी बढती है। तो गुणोसे आपुण समीप आते है। ये सब श्रृत आराधना कमाल है। गौतम पडवा जो आता है। निर्वाण का ये दिन है।
धनतेरस के मध्यरात्री जो बोलने लगे तो 48 घंटे बोलते है। एक भक्तीमय वातावरण आपल्याला बनवायचे आहे. हाच आनंद आपल्याला घरी घेऊन जायचा आहेे. ज्यामुळे बच्चे कंपनीसुध्दा झुमू लागतील, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. यावेळी त्यांनी शिक्षक दिनाच्या शिक्षकांना शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.