जालना : आपल्याला शांती हवी आहे ना, ती कशामुळे मिळेल तर केवळ- केवळ भगवंत परमात्म्यामुळे, त्याशिवाय कुठेही शांती मिळणार नाही, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, शांती तर प्रत्येकालाच हवी आहे, मात्र ती केवळ- केवळ भगवंताजवळ आहे. आपण जर प्रभूजवळ जाणारच नसाल तर कशी मिळेल शांती! आपला नातं हे केवळ जीनवाणीशी आहे. हीच जीनवाणी आपल्यातील गलतफॅमी दूर करु शकते, तेवढे सामर्थ्य तिच्यात आहे. आज जे काही प्राप्त झाले ते केवळ प्रभू भगवंतांमुळेच! वीरथुइर्र्च्या माध्यमातून आज आपण सर्वजण चाळीसाव्या भागापर्यंत पोहचलो आहे, असे सांगून ते म्हणाले की, ही सुध्दा एक प्रकारची साधना आहे.
आजही आपल्या घरात डोकावून पाहा, आपल्यात संस्कार झाले तेही वीरथुईच्या माध्यमातून! आकाशाला पडदा नाही, जीस घर में ना आये कोई ना परेशानी! माता पित्यांची सेवा करायलाच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. यावेळी त्यांनी शिक्षक दिनाच्या शिक्षकांना शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.