Share This Post

Featured News / Featured Slider / Khabar

समाज सेवी श्री प्रफ्फुलजी शिंगवी यांचा अम्रुत महोत्सवी 75 सत्कार

समाज सेवी श्री प्रफ्फुलजी शिंगवी यांचा अम्रुत महोत्सवी 75 सत्कार

ज्येष्ठ उद्योजक व समाज सेवी श्री प्रफ्फुलजी शिंगवी यांचा अम्रुत महोत्सवी 75 सत्कार! साने गुरुजींची पावन भुमी अमळनेर ( जळगांव) येथील रहिवासी, ज्येष्ठ उद्योजक, समाज सेवी, धर्मनिष्ठ श्री प्रफ्फुल जी शिंगवी यांचा अम्रुत महोत्सवी सत्कार ज्येष्ठ समाज सेवी आकुर्डी श्री संघाचे पुर्वाध्यक्ष सुभाषजी ललवाणी व जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार प्रमोदजी ललवाणी यांचे शुभहस्ते करण्यात आला.या प्रसंगी व्यासपिठावर सौ. विमलबाई शिंगवी उपस्थित होत्या.

अम्रुत महोत्सवाच औचित्य साधत नव्याने उभारलेल्या “ आदिनाथ “ ग्रुह वास्तुच उद्घाटन ही शिंगवी परिवाराच्या व अमळनेर येथील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी श्री प्रफुल्ल जींच्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख करतांना शिंगवी परिवारची धर्मनिष्ठा,समाजसेवा , संस्कार क्षमता, गुरुसेवा आदिंचा गौरवपूर्ण उल्लेख करत दिर्घायु व सुद्धरुढ आरोग्याची कामना केली. या प्रसंगी झांबड, बाफणा, मुथा,कांकरीया, सांड, आब्बड छाजेड परिवाराचे सदस्य व अमळनेर येथील समाजबांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत जी, रुपालीजी, रोहित जी महावीरजी, हार्दिक, साक्षी समस्त शिंगवी परिवाराने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar