मंगळग्रह सेवा संस्थानच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवी सुभाषजी ललवाणी व ज्येष्ठ पत्रकार प्रमोदजी ललवाणी सन्मानीत!
मंगळग्रह सेवा संस्थान अमळनेरचे अध्यक्ष दिगंबरजी महाले यांच्या वतीने व्यवस्थापक श्री खैरनारजी यांचे शुभहस्ते पुण्याचे ज्येष्ठ समाजसेवी व उद्योजक सुभाषजी ललवाणी व जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार प्रमोदजी ललवाणी यांना मंगळ ग्रह मंदिराची प्रतिक्रुति श्रीफळ, प्रसाद आदि देवुन सन्मानित करण्यात आले.
सुभाषजी व प्रमोदजी मंगळग्रह मंदिरीच्या दर्शनार्थ मंदिरात आले होते. मंगळग्रह मंदिराची संपुर्ण माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.


