Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

इतका राग कामाचा नाही-प.पू.हिमानीजी म.सा.

इतका राग कामाचा नाही-प.पू.हिमानीजी म.सा.

जालना : राग असावा परंतु तो टोकाला जाईल, इतकाही नसावा. राग अनावर झाल्याने होत्याचे नव्हते, व्हायला वेळ लागत नाही, असा हितोपदेश प.पू.तपज्योत्सना हिमानाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.

त्या गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात बोलत होत्या. यावेळी विचार पिठावर अन्य साधू- साध्वींची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना प.पू.तपज्योत्सना हिमानाजी म. सा. यांनी यावेळी विविध उदाहरणे देखील दिली. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, राग आणि व्देष ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एक लपवली तर दुसरी पुढे आल्याशिवाय राहत नाही, लोभाचेही असेच आहे. जो काही केल्याने जात नाही, म्हणूनच तर त्याला लोभ म्हटले आहे. यावेळी त्यांनी एक शेतकरी, पार्वतीची गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या की, पुरुषार्थ करना। तुम्हे नही पत्ता, हमे भी पत्ता. लेकीन आपुणने कभी भी पुरुषार्थ करो। न जाने हमारा डमरु कब कजेगा। व्देष आणि रागाबद्दलही त्यांनी यावेळी भाष्य केले. राग असावा परंतु तो टोकाला जाईल, इतकाही नसावा. राग अनावर झाल्याने होत्याचे नव्हते, व्हायला वेळ लागत नाही, असेही प.पू.तपज्योत्सना हिमानाजी म. सा. यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar