श्रीरामपूर दि. 18 (वार्ताहर) : येथील जैन स्थानकमध्ये चातुर्मास निमित्त वास्तव्य असलेल्या प्रज्ञाज्योती प्रखर व्याख्यात्या प.पू विश्वदर्शनाजी व विद्याभिलाषी प.पू. तिलक दर्शनाजी म. सा. यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने सौ. जयश्री महावीर कोठारी यांचे मासखमन (30 उपवास) निरंकार उपवासाची तपश्चर्या करणार्या तपस्वींचा तप पूर्णाहुतीचा कायक्रर्म रविवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता स्थानकामध्ये होणार आहे.
श्रीरामपूरचे ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी व आडत व्यापारी रतिलाल कोठारी यांची सुन व औषध विक्रेते महावीर कोठारी यांच्या पत्नी सौ. जयश्री महावीर कोठारी यांनी मासखमन (30 उपवास) केले आहेत. त्यांच्या वरघोडा रविवार दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता रतिशुक्ल बंगला, रामजी बोरावके नगर येथुन निघुन जैन स्थानक मध्ये जाणार आहे. स्थानकमध्ये प्रवचनानंतर सकाळी 9.30 वाजता पचकावणी (तपपुर्ती सोहळा) कार्यक्रम होणार असुन त्यानंतर भावाचा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी वरघोडा व तपपूर्ती समारंभास सकल जैन समाजाने उपस्थित राहावे असे आवाहन श्री स्थानकवासी जैन संघ व कोठारी परिवाराने केले आहे.