Sagevaani.com /जालना: यंदाचा चातुर्मास हा नेहमीच लक्षात राहण्यासारखा आहे. विविध स्पर्धा, ट्रॉफीमुळे तर प्रभावना वाटण्यासाठी लागलेली चढाओढ आणि विशेष करुन जप, तप आणि विविध प्रकारच्या साधनेमुळे हा चातुर्मास प्रत्येकाच्या लक्षात राहील. आज संघातर्फे साध्वींसाठी खास निरोप संभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित श्रावक आणि श्राविकांनी आप-आपली मते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आभार नेहमीप्रमाणेच संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले.
सर्वात शेवटी बोलतांना डॉ. गादिया म्हणाले की, खरे तर या चातुर्मासामध्ये अनेकांचे योगदान राहिले आहे. खुर्च्या पुसणार्यांपासून ते साध्वींच्या गोचरीपर्यंत आणि संघाच्या कर्मचार्यांनी सुध्दा विशेष प्रयत्न केलेले आहेत. या सर्वांच्या योगदानामुळे हा चातुर्मास फलदायी ठरला, असे आपण मानतो. गज्जू काकडेंचा तर आवश्यक उल्लेख त्यांनी यावेळी केला. तर पुजा सकलेचा हिने साध्वींची सातत्याने काळजी घेतल्याबद्दल डॉ. गादिया यांनी तिचा स्वत:च्यावतीने तिला शाल अर्पण करुन र्हद्य सत्कार केला. याप्रसंगी साध्वी प. पू. सौम्यज्योतिजी म. सा. यांंनी आपल्या पहाडी आवाजात गीत सादर करुन उपस्थितांचे पारणे फेडले. उद्या सकाळी 8 वाजता संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा; साध्वी अर्हतज्योतीजी म. सा; साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा; साध्वी हितसाधनाजी म. सा; प.पू.गुरुछायाजी म.सा; साध्वी सौम्यज्योतिजी म. सा.आदींना संघातर्फे निरोप देण्यात येणार आहे.
तर यावेळी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. म्हणाल्या की, साधु- संतांचं जे काम असतं, तेच आपण केलं आहे. या पेक्षा काहीही वेगळं असं केलं नाही. आपल्या श्रावक- श्राविकांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून करुन घेता येईल तेवढी आराधना करुन घेण्याचा प्रयत्न केला. तर साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी म्हटले की, 99 पॉईट आम्ही तुमच्याकडून साधना करुन घेतली असली तरी त्याला तुमच्याकडून प्रतिसाद नसता मिळाला तर ते कामही शंभर टक्के पूर्ण झाले नसते. मात्र आपली साथ मिळत गेल्याने हे शक्य झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.