श्रीरामपूर दि. 25 ( वार्ताहर ) आपले जीवन सार्थकी व आनंदी होण्यासाठी सत्संग हा एकच पर्याय आहे. सत्संगाच्या मॉलमधून माळ खतरेदी करावा या मॉलवार एकच नाही तर अनेक माल
फ्री मिळतो. हा माल खरेदी करून जीवनाचा आनंद लुटावा आणि पर्युषण पर्व उत्साहात यशस्वी करा असे विचार श्रीरामपूर जैन स्थानक चातुर्मासाठी सुरु असलेल्या प्रवचनातून प्रज्ञाज्योती प्रखर व्याख्यात्या प.पू .श्री. विश्वदर्शनाजी यांनी व्यक्त केला.
जगात असा कोणताच माणूस नाही. व्यापार करीत नाही. प्रत्येक क्षेत्रात व्यापार हा असतोच वडीलधाऱ्यांच्या परंपरेनुसार व्यापार चालू आहे. असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या कि, व्यापारात उतरल्या आहेत. परिवाराच्या पालन पोषणासाठी व्यापार हा करावाच लागतो. सांसारिक व्यापारात नफा तोटा असतो. धार्मिक व्यापारामध्ये नफाच नफा असतो.
धर्मात सत्संगाचा माल असतो. त्यात अनेक विभाग असतात. सत्संगाच्या मॉलमधे प्रत्येक प्रकारचा माल असतो. धर्म,पुण्य आणि पापाचे विभाग असतात.धर्माच्या फर्ममध्ये दहा प्रकारचे माल मिळतात.पुण्यकर्मामध्ये ९ तर पापाच्या कर्मात १८ प्रकारचे माल मिळतात. काय खरेदी करायचे याचा विचार प्रत्येकाने प्रत्येकाने ठरवायचे.
धर्माच्या फार्ममधून माल खरेदी केला तर त्यावर जीवन सार्थकी लागण्यासाठी एकावर एक अनेक माल विनामूल्य मिळतात. धर्माचा माल खरेदी केल्यास शरीर,मन शुद्ध राहते. ताकदवान बनते. क्रोधापासून सुटका मिळते . शरीर स्वस्थ राहिले तर आत्मशुद्धीचा मार्ग खुला होतो. कर्माची निर्जरा होते.सत्संगाच्या मॉलमधे माल खरेदी केल्यास इंद्रियांवर ताबा मिळविण्याचा उपाय सापडतो. नम्रता शिकता येते. पुण्याच्या फार्म मध्ये चांगला माल प्राप्त होतो.पर्युषण पर्व काळात मन,वाचा,शरीरावर नियंत्रण मिळविण्याचा अभ्यास करावा. कोणाचेही मन दुखावू नका. प्रभूचे स्मरण करा. सत्संगाच्या मॉलमधे सात्विक क्रेडिट कार्डवर गुरुकृपेने अधिकाधिक पुण्याचा माल खरेदी करून आपल्या खात्यावर कमाई करावी असा उपदेश पू.श्री. विश्वदर्शनाजी म.सा यांनी दिला.
विद्याभिलाषी पू.श्री. तिलक दर्शनाजी यांनी प्रवचनातून पर्युषण पर्व काळात धर्मआराधना टॅप साधना करून आत्म निर्जरा करा असा उपदेश दिला