Sagevaani.com /जालना: संसार हा क्षणभंगुर आहे, त्यात सर्वत्र दु:खच दु:ख आहे. असे असतांनाही मनुष्य त्यालाच का चिकटून बसला आहे, हे कळत नाही. दिक्षा घेणे हे कधीही चांगले आहे. यात दु:ख नसून सुखाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही, म्हणून दिक्षा ही केव्हाही चांगलीच आहे, असा हितोपदेश साध्वी प. पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. तत्पूर्वी सभा मंडपात जप करण्यात आला. त्यानंतर प. पू. हर्षप्रज्ञाजी म. सा.मार्गदर्शन केले. त्ंंया म्हणाल्या की, ही आत्मा असून तिला त्रास देऊ नका, तीला त्रास दिल्याने आपले भले थोडेच होणार आहेे.संसार हा क्षणभंगुर आहे, त्यात सर्वत्र दु:खच दु:ख आहे. असे असतांनाही मनुष्य त्यालाच का चिकटून बसला आहे, हे कळत नाही. दिक्षा घेणे हे कधीही चांगले आहे. यात दु:ख नसून सुखाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही, म्हणून दिक्षा ही केव्हाही चांगलीच आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, संसारात सर्वत्र दु:खच भरले आहे, तरीही आम्ही मात्र त्यालाच चिटकून आहोत.
संसार हा क्षणभंगुर आहे, त्यात सर्वत्र दु:खच दु:ख आहे. असे असतांनाही मनुष्य त्यालाच का चिकटून बसला आहे, हे कळत नाही. दिक्षा घेणे हे कधीही चांगले आहे, असेही त्यांनी सांगितले. आज त्यांनी उत्तरायण सुत्रातील वीस आणि एकविसाव्या अध्यायाचा अभ्यास केला. त्या म्हणाल्या की, संसार हा दु:खाने भरलेला आहे, उलट दिक्षेत एक प्रकारे शिक्षा वाटत असली तरी खरे सुख हे सयंमात आहे, दिक्षेत आहे, असे सांगून त्यांनी प्रभू महावीर आणि उत्तरायण सुत्राबद्दल विविध उदाहरणाव्दारे इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.