श्री प्रभु राम व भ. महावीर जन्म कल्याणक निमित्त मेगा ब्लड डोनेशन कॅंप चे आयोजन ! 1000 रक्त बॉटल रक्त संकलनाचा संकल्प! आज प्रभु रामनवमी चे औचित्य साधत व भ. महावीर जन्म कल्याणक (2624) सप्ताहाचा एक भाग म्हणुन आज औंध बाणेर बालेवाडी पाषाण पिंपळे निलख जैन सकल समाजाच्या वतीने महा रक्तदान यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. 810 रक्त दात्यांनी रक्तदान करुन एक उच्चांक प्रस्थापित केला व संयोंजकांच संकलनाच उद्दीष्ठ पुर्ण झाल्याचा विश्वास मुख्य संयोजक श्री सचिन जी नहार यांनी व्यक्त केला. या महारक्तदान शिबिराचे मुख्य संयोजक श्री जैन श्रावक संघ औंध,श्री विमलनाथ जैन श्वेतांबर टेंपल ट्रस्ट, श्री विमल दर्शन जैन ट्रस्ट गौतम लब्धी फाऊंडेशन औंध आहेत.
ABBPP जैन सकल संघाने रक्तदान शिबीराचे सुंदर आयोजन नियोजन केल्यामुळे रक्तदात्यांना प्रेरणा मिळुन उत्साह वाढला आहे. संयोजकांना प्रेरित करुन आवश्यक पाठबळ देण्याचे काम प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक श्री सुनील जी व सचिनजी नहार यांनी केले. उपाध्याय प्रवर, अर्हम विज्जा प्रणेता पु प्रविण ऋषिजी म.सा. हे नहार कुटुंबियांचे प्रेरणास्थान आहे. रक्तदान शिबिरास अनेक गणमान्य नेत्यांनी व्यावसायिकांनी भेट संलग्न संघाच्या पदाधिकार्यांनी भेट देत या महान यज्ञाचे व आयोजकांचे अभिनंदन केले.
या महान यज्ञास पुण्याचे लोकप्रिय आमदार श्री सिध्दार्थ जी शिरोळे व सहकार्यांनी भेट देवुन शुभेच्छा दिल्यात. तसेच शिबीरास पुणे जैन सकल संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयकांतजी कोठारी व महामंत्री अनिल जी नहार ,कॉंग्रेस कमिटी महाराष्ट्र चे सरचिटणीस अभय जी छाजेड,आकुर्डी निगडी प्राधिकरण जैन श्री संघाचे अध्यक्ष सुभाषजी ललवाणी, क्रष्णा डायग्नोस्टिक चे चेअरमन राजेंन्द्रजी मुथा सौ. सुनिता मुथा प्रसिध्द उद्योजक मनोज जी छाजेड , पुना सकल संघाचे कार्याध्यंक्ष विलासजी राठेड,गौतम निधीचे महावीर नहार, गौतम जी नाबरीया सदिच्छा भेट दिली. या जीवनदान देणार्या आयोजनार्थ प्रातिनिधिक रुपात श्री सचिनजी व सुनीलजी नहार बंधुंना सुभाषजी ललवाणी यांचे शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.आयोजकांतर्फे सुभाषजी ललवाणी व राजेंद्रजी मुथांनाही सन्मानित करण्यात आले