सहजीवन- नातेसंबंधाचे उपासक, दुरद्रुष्टी चे अभ्यासक श्रध्येय स्व.भवरलालजी जैन यांच्या “जैन हिल” या मुल्यवर्धित संस्थेस आकुर्डी- निगडी- प्राधिकरण श्री संघाच्या विश्वस्तांची श्रध्दा- सुमन अर्पण करणारी भेट! जैन इरिगेशन चे चेअरमन श्री अशोकजी जैन बरोबर साधला संवाद! जळगावः आज आकुर्डी निगडी प्राधिकरण जैन श्रावक संघाच्या पदाधिकार्यांनी संघाध्यक्ष सुभाषजी ललवाणी यांच्या नेत्रुत्वात जगविख्यात जैन हिल च्या विविध प्रकल्पास व “गांधी तिर्थास” भेट देत संपुर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती व पुर्व इतिहास विस्त्रुत रुपात प्रशासकीय अधिकारी श्री गिरीष जी कुलकर्णी दिली. संस्थेच्या वतीने.संचालक श्री अभयजी जैन यांनी श्री संघाच्या पदाधिकार्यांचे स्वागत केले.
जल संधारण, पाणी आडवा पाणी जिंरवा, सोलर प्रकल्प, ठिबक संचन योजना, टिश्यु कल्चर प्रकल्प आदि विविध प्रकल्पांना भेट देत प्रत्येक प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. जैन उद्योग समुहाचे चेअरमन श्री अशोकजी जैन यांची सदिंच्छा भेट घेत श्रध्येय स्व. भाऊंप्रति आपल्या संवेदना प्रकट करत क्रुतज्ञता व्यक्त केली. आकुर्डी श्री संघाचे अध्यक्ष सुभाषजी ललवाणी, उपाध्यक्ष विजयजी गांधी, पुर्वाध्यक्ष जवाहरजी मुथा, कोषाध्यक्ष नेनसुख जी मांडोत, महामंत्री राजेंन्द्र जी छाजेड, विश्वस्त सुर्यकांत जी मुथीयान, मोतीलालजी चोरडीया आदिंनी जैन हिलला भेट दिली.