श्रीरामपूर दि. 16 (वार्ताहर) : विनयवृत्ती ही सर्वकष आहे. ती नसेल तर त्याची प्रगती विकास होणारच नाही, विनयवृत्ती मुळे जीवनाला अर्थ आहे असे विचार जैन स्थानकमध्ये प्रवचनातुन प. पू. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी व्यक्त केले.
अर्ंतगड सुत्रातील विनय या विषयावर बोलतांना त्या म्हणाल्या की जी कामे नम्रतेने होतात ती उर्मटपणाने होत नाहीत, नम्रता हा जीवनातील एक सदगुण आहे. नव्हे तर जीवनाचा मुलमंत्र आहे. दुसर्या समोर वाकल्यामुळे आपल्यातील गर्वपणा नाहिसा होतो. विनयशिल माणसांना समाजात किंमत असते. विनय आपल्याला शांततेची शिकवण देतो. विनय हे एक प्रकारे तपच आहे. जेव्हा आपण वाकतो तेव्हा आशिर्वाद मिळतात, दंगलमध्ये मंगल करावयाची ताकद विनयामध्ये असते. आपले नशिब बदलायचे असेल तर अंगी नम्रता हवीच. आपले मत आपल्याला ठरविता आले पाहिजे. कितीही कठीण प्रसंग आला तरी नम्रता असेल तर आपण त्या प्रसंगातुन बाहेर पडु शकतो. सत्संग खुप शिकवतो. नेहमीच शिक्षणाबरोबर व्यवहार शिक्षण दिलेच पाहिजे. विनयामुळे माणुस साधक बनतो.
अन्नदान, वस्त्रदान, जलदान ही पुण्ये आहेत. प्रभुचे नामस्मरण हे सर्वात मोठे पुण्य आहे. विनय म्हणजे एक प्रकारचे तप आहे. विनय बाळगणारा तपस्वीच समजतात कारण तो गर्वापासुन दुर राहतो, पुर्वी विद्यार्थी गुरुचा आवडता असे नम्रतेणे राहवे लागत असे तेथे नम्रता गुण असणारा विद्यार्थी गुरुचा आवडता असे नम्रतेणे दुसर्याला जिंकता येते. व्यक्तीत्वाला मोठे करण्यांत विनयशील वृत्तीच हातभार लावते असे पू. श्री. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी सांगितले.
पू. तिलकदर्शनाजी म.सा. यांनी प्रवचनातुन सांगितले की मनाला एकाग्र करुन स्वाध्याय केला तर मन शांतीचा अनुभव प्राप्त होतो. चित स्थिर असेल तर मनशांतीचा अनुभव प्राप्त होतो. चित स्थीर झाले तरच केवळ ज्ञानाच्या प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. म्हणुन जास्तीत जास्त धर्म आराधनेत तपस्या करावी आणि जीवन सफल बनवावे.