श्रीरामपूर दि. 24 : राग मानसिक असंतुलन बिघडवतो, रागावर नियंत्रण ठेवण्यास शिका तरच मानसिक संतुलन कायम टिकेल. मेंदु शांत ठेवण्यासाठी राग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करा असा उपदेश प्रवचनातुन प्रज्ञाज्योती प्रखर व्याख्याता पू. श्री. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी दिला.
मानसाला राग आल की, त्याचे शरिर स्वास्थ बिघडते, अपचन, रक्तदाब, मधुमेह आदि व्याधी बळावतात. सामाईक केल्यामुळे मनशांत राहते, मन शांत राहिल्यास शरिर चांगले ठेवण्यास मदत होते. क्रियेला प्रतिक्रीया करु नका, यामुळे शांतता नष्ट होते.
जैन धर्मात सामाईक ही पवित्र साधना आहे. त्यामुळे मन शांती लाभते. जीवन उत्साहीत व आनंदी बनते. अंगी विनयशिलता येते. शनिवार दि. २३ पासुन राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषिजी महाराज जन्मोत्सव सप्ताहाचा प्रारंभ झाला आहे. गुरुच्या बद्दल आदर भावना दाखविण्यासाठी सामाईक दररोज करणे आवश्यक आहे.
लाखो रुपयांचे सोने दान करुनही पुण्य मिळणार नाही तेवढे पुण्य एक सामाईक केल्याने लाभते. शरिर स्वास्था बरोबर मानसिक शांतता टिकविण्यासाठी सामाईक लाभदायक ठरते. शरिराच्या तोल सांभाळण्याबरोबर मानसिक संतुलनही संभाळावे, आपण नेहमी चांगली भाषा बोलावी, वाणी गोडवा नसेल तर संबंध बिघडतात, ते पुन्हा सुरळीत करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. आपले डोके गिझर नव्हे कुलर बनवा, शांतता असेल तर सर्व प्रश्न अपोआप सुटतात. सामाईक शब्दाची प्रत्येक अक्षरानुसार व्याख्या पू. विश्वदर्शनाजी यांनी आपल्या प्रवचनातुन विषद केली.
पू. श्री. तिलकदर्शनाजी म.सा. म्हणाले की, पापाचे चिंतन करु नका, घृणा नको, चांगले कर्म करुन संयम ठेवा, गुरुंच्या आशिर्वादानुसार धर्माचरण करीत रहावे.