जालना : आपलं अध्ययन इतकं खोल असलं पाहिजे की, त्याची कोणतीही सीमा नसावी. म्हणूनच उत्तर शोधतांना ती कुठे असतात आणि आम्ही शोधू लागतो दुसरीकडेच, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधनेच्या अध्यायातील प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, आम्ही सुध्दा गलत असू शकतो. परंतू अनेक जण म्हणतात की, मै गलत नही हू और नही हो सकता! संतुलन ठेवा! एक- दुसरे की कमी ना देखे। अरे भाई क्यो गलत नही हो सकते! अगर दुसरो को सत्ता हवी असेल तर ती त्याला खुशाल द्यावी, असे मुळीच समजू नये की, ती आपल्याला का मिळाली नाही. उलट असा विचार करा की, त्याला जे काम आठवले आहे, ते पूर्ण करण्यासाठीच त्याला ही संधी मिळाली असेल. सामाईक कशासाठी करतो?
आत्मशुध्दीची कामना चाहिए तो आपने से मुक्ती मिळणार कशी, मैत्री भाव हमेशा रखना चाहिए! राग आणि व्देष या दोन गोष्टी म्हणजे मोहनिय कर्म! या दोन गोष्टी अशा काही ठेवल्या आहेत की, त्याचे पाहयचे काम नाही, असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.