Sagevaani.com /जालना: मन हे कितीही चंचल असू द्यात त्याला काबूत आणण्याचे साधन म्हणजे जाप हे आहे. म्हणूनच जाप हा प्रत्येकानेच केला पाहिजे. त्यामुळे आपल्याला एका वेगळ्या शक्तीची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही, असा हितोपदेश संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा.यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती. आज संघामध्ये विविध प्रकारचा जाप करण्यात आला. श्रावक- श्राविकांना उभे राहून चारही दिशांना वळण्याचे सांगण्यात आले.
पुढे बोलतांना संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. म्हणाल्या की, काल आणि आजही आपण विविध प्रकारचा जाप केला. काल सुर्यदेवांबद्दल माहिती घेतली. तर आज कर्क राशीबद्दल जाणून घेऊ या! या राशीच्या लोकांना राग फार येतो. हे लोक चंचल खूप असतात. त्यांना एका ठिकाणी बसणे शक्य नाही. नेहमीच त्यांची हालचाल सुरु असते. नऊ ग्रहांचा जाप केला तरी तो नऊ तीर्थंकरांचा आहे. काल केलेला जापही तीर्थंकरांचाच होता. आणि आज जो करण्यात आला तोही तीर्थकरांचा आहे. मन हे नेहमी स्थिर असले पाहिते. मन हे चंचल असले तरी त्याला काबूत ठेण्याचे काम हे आपले आहे. कर्क राशीबद्दल आपण बोलत आहोत. जाप केल्याने मन हे स्थिर राहते. आपल्यावर अनेक संकटं येतात. ते थांबवण्याची शक्ती कोणातही नाही. परंतू ती जाप केल्याने आपल्याला जी ऊर्जा मिळते, शक्ती मिळते तेच हे संकट दुर करण्यास मदत करते. आपण भाषण ऐकतो की जीन वाणी! भाषणात आणि जीनवाणीत खूप फरक आहे. प्रभूंच्या जीनवाणीला देसना म्हटले जाते. पण भाषणाला नाही! असे का? कारण जीनवाणी ही सत्य असते. तर भाषण हे जे मनाला येईल त्या पध्दतीने बोलले जाते. नको ते बोलले जाते. विषय एक असतो आणि बोलले दुसरेच जाते. त्याला भाषण म्हणतात. देसना नाही! असे सांगून संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी आपल्या प्रवचनातून कर्क राशीबद्दल इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.