Sagevaani.com /जालना: नऊ वर्षाचे असतांना आई आणि बारा वर्षाचे असतांना वडीलांचे छत्र हरवल्यानंतर मुलमुनी म. सा. अत्यंत कठीण परिस्थितीतून गेलेl परंतू ते डगमले नाहीत तर खंबीरपणे उभे राहिले, असा हितोपदेश संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिलाl
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होतीl
प्रवचनाच्या प्रारंभीच साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी प्रभूंचे गुणगाण केले. दुनियामें देव अनेक है। पर अरिहंत क्या कहना॥
पुढे बोलतांना साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. म्हणाल्या की, ज्यांच्या डोक्यावरील आई- वडीलांचे छत्र हरपते त्यांना खर्या अर्थाने जीवनाचा अर्थ कळतो. राजस्थानमध्ये गादिया कुटूंबात जन्मलेले मुलमुनी म. सा. एकवेळ कन्हैय्यालालजी म. सा. यांचे प्रवचन ऐकण्यासाठी गेले, तेथूनच त्यांची बुध्दी खर्या अर्थाने पालटली असे म्हणता येईलl त्यांनी प्रवचन संपल्यानंतर दिक्षा घेण्याचा विचार केला आणि तो अंमल देखील आणला.परंतू त्यांनी एका ठिकाणी काम करणे टाळलेl आपणही एखाद्याला कामाला ठेवतो तेव्हा त्याच्याकडून अनेकविध कामे करुन घेतो. मुलमुनींना कामाच्या बदल्यात काय मिळणार होते तर राहण्यासाठी जागा आणि खाण्यासाठी अन्न! एवढ्यावरच गुजरान करावी लागली असतीl परंतू त्यांनी हे काम नाकारले आणि दिक्षा घेण्याचा संकल्प केलाl तो तडीस देखील नेला. आज मुलमुनी म. सा. यांचा स्मृतीदिवस संघात पाळण्यात आलाl त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रवचनात साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. बोलत होत्या. त्यांनी आपल्या प्रवचनातून मुलमुनीजी म. सा. बद्दल इंत्यभूत माहिती दिलीl याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.शेवटी संघाचे कचरुलालजी कुकूंलोळ यांनी सुत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार मानलेl