श्रीरामपूर दि. 20 (वार्ताहर) : जगात कोट्यावधी माणसे आहेत, परंतु नुसता माणुस असण्यात अर्थ नाही. माणसामध्ये माणुसकीचा ओलावा असला तरच त्या माणुस पणाला अर्थ असतो. माणुसकीच माणसामधील भेद दुर करु शकते असे विचार जैन स्थानकमध्ये चातुर्मासातील प्रवचनातुन प्रज्ञा ज्योती पू. श्री. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी व्यक्त केले.
मनुष्य जन्म दुर्लभ आहे असे धर्म सांगतात, माणसात जर माणुसखी किंवी मानवता नसेल तर मानव धर्माला अर्थ उरत नाही. असे स्पष्ट करुन त्या म्हणाल्या की, क्षमा हा गुण जीवनात महत्वाचा ठरतो, क्षमा केल्यामुळे कमी पणा होत नाही, जीवन शांततेत जगता येते, येशु ख्रिस्ताने सुध्दा अंतीम समयी देवाकडे दुसर्यांना माफ करण्याची विनंती केली. दुसर्याच्या चुका माफ करण्यांत पुरुषार्थ असते.
माणसाच्या जन्म नाते संबधाने बांधला जातो, ती नाती टिकण्यासाठी चुका विसरुन क्षमा करण्याची वृत्ती हवी. ज्या ठिकाणी माणुसकी असते तेथेच धर्माचे पालन होते. माणुसकी हा खरा धर्म आहे. आजकाल माणसे वाढत आहेत पण माणसुकी लोप पावत आहे. इतरांच्या वेदना जाणुन त्या दुर करणारे माणसे समाजपुढे आदर्श ठरतात, आपल्याला योगी बनता येईल असे नाही तर चालेल पण सहयोगी बनण्याचा प्रयत्न करावा.
माणुसकी हा धर्म जपला तर स्वर्गातील प्रवेश सुलभ होतो, कर्माची बंधने तुटतात, माणुसकी फक्त सेवेतच नसते तर पीडीतांची दु:खे दुर करण्यासाठी आपले धीराचे शब्द देखील पुरेसे ठरतात. आज धन संपत्तीला विशेष महत्व दिले जाते, माणुसकीला विसराल तर जीवनात सर्व काही गमावुन बसाल म्हणुन माणुसकी जपा आणि जीवन सुखी व आनंदी बनवा असा उपदेश पू. श्री. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी दिला.
विद्याभिलाषी पू. श्री. तिलकदर्शनाजी म.सा. यांनी ही प्रवचनातुन भगवंतांनी माणुसकी जपुण दुखी पिडीतांना मदत करण्याचा उपदेश दिला आहे. त्याचे आचरण सर्वांनी करावे, जीवनात समाधान लाभेल.