Sagevaani.com /जालना: हे माणव तू जन्माला आला आहेस तर श्रीमद् उत्तराध्ययन बोल! तुम्ही- आम्ही खरोखरच धन्यवान आहोत, पुण्यवान आहोत की, जी प्रभूंची अंतीम वाणी ऐकण्याचं भाग्य तुम्हा- आम्हाला लाभले आहे, असा हितोपदेश साध्वी प. पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना साध्वी प. पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, हे माणव तू जन्माला आला आहेस तर एकवेळ तरी प्रभूंची वाणी ऐक, चिंतन कर, मनन कर! त्याच खर्या अर्थाने सौख्य सामावलेले आहे. तुम्ही- आम्ही खरोखरच धन्य आहोत, जी प्रभूंची अंतीम वाणी ऐकण्याचं भाग्य तुम्हा- आम्हाला लाभले आहे. ज्ञानाची डुबकी यात लावली जाते. जी आपल्याला कुठेही मिळणार नाही. तो क्षण आपल्यासाठी भाग्यासाठी भाग्याचाच आहे. आपली आत्मा खरे तर या जीणवाणीसाठी तरसली पाहिजे.
कारण यातच आपले सुख सामावलेले आहे, दु:खापासून दूर राहण्याचा आणि सुखाला जवळ करण्याचा हा मार्ग आहे, म्हणून प्रत्येकानेच जीणवाणी ही श्रवण केली पाहिजे. उत्तराध्यायन सुत्र हे काही अहिरे- गहिरे नाही तर खरे- खुरे सुत्र आहे. आणि श्रवण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. ती सर्वांनी इमाने- इतबारे पार पाडली पाहिजे, असे सांगून त्यांनी प्रभू महावीर आणि उत्तराध्यण सुत्राबद्दल विविध उदाहरणाव्दारे इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन करुन सर्वांचे आभार मानले