श्रीरामपूर दि. 16 (वार्ताहर) महापुरुषांच्या कथा ऐकण्याची संधी सर्वानाच मिळत नाही. महापुरुषांच्या कथा ऐकल्यावर प्रत्येकाच्या व्यथा दूर होतील. या कथा जीवनाला नवीन देतात. असे प्रतिपादन प्रखर व्याख्यात्या प.पु.विश्वदर्शनाजी म .सा यांनी जैन स्थानकमध्ये प्रवचनातून केले.
महापुरुषांची महती सांगताना पू . विश्वदर्शनाजी म्हणाल्या कि,महापुरुषांचे नाव जिभेवर येणे हे पुण्य आहे. टी .व्ही वर दाखविल्या जाणाऱ्या मालिकांच्या कथातून पश्चाताप होतो. महापुरुषांच्या कथा या मार्गदर्शक ठरतात . त्या जीवन जगण्याची प्रेरणा देतात. धर्मकथा कधीही रटाळ वाटत नाही. त्यांच्या चिंतनाने ,मननाने मनाची मरगळ दूर होते.
उद्यानामध्ये फुलांचे सौंदर्य आपण पाहतो. त्याच्या मुळीचा विचार करीत नाही. या मुळात जे कष्ट घेतलेले असतात .त्यामुळेच फुल उगवते म्हणून वरवरचे सौंदर्य ,रुतो, पाहण्यापेक्षा आतील मूळ पाहावे .” उपर शेरवानी ,नीचे परेशानी” अशी स्थिती होऊ देऊ नका.
धर्मकार्यात धर्मग्रंथांना विशेष महत्व आहे. प्रत्येकाने धर्म ग्रंथाचा अभ्यास केला तर सांसारिक समस्या सुटण्यास मदत होईल. मन शांत राहील मनाचे संतुलन टिकून राहील. जीवन फार सुंदर आहे . धर्मग्रंथाच्या माध्यमातून ते समजावून घ्या. धर्मग्रंथ मार्ग दाखवतात .”गम दूर करनेवालोंको आगम केहेते है”सर्व समस्यांचे उत्तर धर्मग्रंथात असते शास्राचा अनुभव घेऊन पहा. अनुभव येईल.
महापुरुषांनी दाखविलेल्या मार्गाने चालत राहा .प्रवचन ऐका ,चांगल्या विचारांचे आचरण करा. आत्मा शुद्ध व निर्मळ बनेल धर्मग्रंथांचे एक पान दररोज वाचावे . धर्म आराधना करून पूर्व पुण्याईने मिळालेला चातुर्मास यशस्वी करा. असे आवाहन पू .शीर. विश्वदर्शनाजी म .सा .यांनी केले.
पू . श्री . तिलकदर्शनाजी म .सा प्रवचनातून म्हणाल्या ,नालायक कसे बनतात त्यामधिल “ना ” अक्षर काढा तो “लायक” असा होईल. मोहनीय कर्माने आत्मा हि नालायक बनली आहे. आत्म्यास लायक करण्यासाठी जिनवानी श्रवण करा .ज्ञान दर्शन चारित्र्याचे पालन करा. व भगवंतांचे आज्ञांचे पालन करा. बालक हा जन्मतःच चालत नाही त्याला चालणे आई शिकवत असते. धर्मक्षेत्रात प्रभू हे सर्वांचे पालक आहेत क्षमा क्षेत्र स्थान प्रभू ही आईची गोद आहे.प्रेमाची अनुभूती होणे गरजेचे आहे. असे भाव निर्माण करा.
महापुरुषांच्या कथा श्रवणाने व्यथा दूर होतात.- पू .श्री . विश्वदर्शनाजी म सा
