श्रीरामपूर दि. 17 ( वार्ताहर ) जीवनात जर चांगले करायचे असेल तर चांगली सांगत मिळाली पाहिजे. मनुष्य जीवन चार्ज करण्यासाठी सत्संग हवा आहे. असा उपदेश जैन स्थानकमध्ये चातुर्मासाठी सुरु असलेल्या प्रवचनातून प्रज्ञाज्योती प्रखर व्याख्यात्या प.पू.श्री.विश्वदर्शनाजी म.सा यांनी दिला.
प्रवचनात त्या म्हणाल्या मोबाईल,टीव्ही रिचार्ज केल्याशिवाय चालत नाही. त्याप्रमाणे मनुष्य जीवन सतत रिचार्ज करण्यासाठी सत्संगाची जरुरी असते. सत्संग माणसाचे कल्याण करतो.सत्संगातील कथा ऐकल्यामुळे सांसारिक व्यथा दूर होतात. कथेमुळे जीवन बदलते. साधू संतांची संगत मिळणे भाग्याचे समजतात. साधू संतांचे गुण अमूल्य आहेत. त्यांच्या शिकवणीनुसार वागणे हे आपले कर्तव्य ठरते.सद्गुरू जीवनात मार्ग दाखवितात.
पिंपळ,वड हे वृक्ष कार्बनडायऑक्साईड म्हणजे विषारी वायू आत घेऊन प्राणवायू म्हणजेच चांगला विचार माणसाला देतात. सांगत कोणाची करावी हे शिकले पाहिजे संतांजवळ बसाल तर त्यांच्या कडून विचारांचा खजाना मिळेल. संतांचे प्रवचन ऐकण्यास मिळणे दुर्लभ असते. मनुष्य जीवन चार्ज झाले नाही तर वाईट विचारांचे वलय तयार होते. माणूस वाईट मार्गाला लागतो.
कोळसा हातात घेतला तर हात काळे होतात. पण चंदना चे पुढे हातात घेतले तर त्याचा सुवास येतो.याचाच अर्थ चांगल्याची सांगत धरली तर परिणामही चांगले दिसतात. सत्संगासाठी दिवसभरातील एक तास वेळ काढावा अशी सूचना महासातीजींनी केली.
संगीत माणसाला प्रसन्न ठेवते आनंदी ठेवते. ताल, लय, स्वर यांचा संगम म्हणजेच संगीत सात सूर एकत्र करून एक सुंदर गाणे तयार होते. संगीतामुळे आजरी माणसाला बरे वाटते संगीत हे ध्यान धारणा आहे. जीवन मस्त आणि स्वस्थ ठेवायचे असेल तर संगीत ऐकलेच पाहिजे.सांगितलं जीवनात महत्व दिलेच पाहिजे.संगीतात सात स्वर असतात पहिला स्वर सा म्हणजे साधू संतांची सांगत करावी म्हणजे जीवन सार्थकी लागण्यास मदत होते.