श्रीरामपूर दि . 18 ( वार्ताहर ) मनुष्य जन्म क्षणभंगुर आहे. जीवनाचा काहीही भरोसा नाही. शाश्वत आणि नश्वर यातील फरक ओळखून मनुष्य जन्माचा सदुपयोग करावा. असे आवाहन प्रज्ञाज्योती प्रखर व्याख्यात्या प.पू.श्री.विश्वदर्शनाजी म.सा यांनी केले.
भगवती सूत्रात महावीरांना सव्हिस हजार प्रश्न विचारण्यात आले. त्याची सविस्तर उत्तरे महावीरांनी दिली आहेत. असे स्पष्ट करून त्यांनी सांगितले कि, धर्माविषयीचे जे प्रश्न असतात त्यांचे उत्तर गुरूकडून धर्मज्ञान असणाऱ्या जाणकाराकडून करून घ्यावे शंका,संशय ठेऊ नये. दिवसागणिक आपले आयुष्य घटत जाते. तरीही आपली संसाराविषयीची आसक्ती संपत नाही. धर्मराधनेसाठी वेळ काढा उरलेल्या आयुष्याचा सदुपयोग केला तर जीवनाचे सार्थक होईल. “मोजून पहा आयुष्याची बेरीज येते शून्य, जाताना घेऊन जाऊ थोडे तरी पुण्य”
मन नेहमी जागरूकच पाहिजे. शाश्वत तरच शाश्वत आणि नश्वरातील फरक कळतो. फार पुण्याने आपल्याला मनुष्य जन्म मिळाला म्हणून आयुष्य सुधारण्यासाठी प्रभूशी नाते जोडावे प्रभूला विसरू नका. फक्त ईश्वरच आपल्यावर प्रेम करतो.बाकी कुणीही नाही.बाकीच्यांचे प्रेम वरकरणी असते. तरुणपणी वाढदिवस साजरे करतात. पण म्हातारपणी काढ दिवस असतात. ह्या जीवन अर्धात आयुष्य म्हणजे एक मेळा आहे. या मेळ्यात अनेकजण येतात. अनेकजण जातात. ईश्वराची आठवण ठेवणाऱ्यांना जीवन जगणे सुलभ होते.
धर्मज्ञानाबद्दल अभ्यास करणे धर्मशास्राने सांसारिक समस्या सुटण्यास मदत होते. संसार नाशवंत आहे. आपले शरीर एक दिवस मातीतच जाणार आहे. अरे मग त्याचा अभिमान कशासाठी असा सवाल त्यांनी केला तरुण वयातच धर्म आराधना करावी प्रभू प्रति आस्था ठेवा धर्मआराधनेमुळे कर्माची निर्जरा होते.आत्मा परमात्म्याशी जोडण्यासाठी धर्म आराधना आवश्यक आहे. इच्छांचा मन,काया,वाचेने विरोध करा. म्हणजे परम सुखाची प्राप्ती होईल असे प्रज्ञाज्योती प.पू.श्री. विश्वदर्शनाजी म.सा यांनी सांगितले .