भारतीय जैन संघटना पिंपरी- चिंचवड विभाग आढावा बैठक आकुर्डी जैन स्थानकात संप्पन्न! संस्थापक अध्यक्ष श्री शांतीलालजी मुथ्थां नी केले मार्गदर्शन! आकुर्डी- भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या 30 व 1 तारंखेला पुण्यात होत आहे. अधिवेशना पुर्व आढावा बैठकीच आयोजन पिंपरी- चिंचवड सकल जैन समाजाच्या वतीने आकुर्डी जैन स्थानक भवनात करण्यात आले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शांतीलालजी मुथा यांनी तीन दशकापेक्षा अधिक काळापासुन अविरतपणे करित असलेल्या सामाजिक कामाचा सविस्तर रित्या आढावा घेत महाराष्टाच्या कानाकोपर्या पर्यंत काढलेली पदयात्रा, सामुदायिक विवाहाची चळवळ, आपत्ति ग्रस्त, भुकंप ग्रस्त क्षेत्रात केलेले काम, आत्महत्या ग्रस्त शेतकर्यांच्या मुलांच पालकत्व, शिक्षण क्षेत्रातील आमुलाग्र बदल, पाणी बढावो पाणी बचाओ द्वारे केलेली क्रांती आदि वर सविस्तर व परखड पणे आपले विचार मांडले.
आता युवकांच्या हाती ही जबाबदारी सोपवून त्यांच्या अफाट बुध्दीमत्तेच्या जोरावर ह्या कार्यात आमुलाग्र बदल करुन भविष्य कालीन योजनांची राष्ट्रीय अधिवेशनात घोषणा करण्याचा मानस या प्रसंगी मुथ्था यांनी व्यक्त केला. अनेक मान्यवरांनी विषयाला अनुसरुन अनेक प्रश्न विचारले व त्यास समर्पक उत्तर दिली . आकुर्डी निगडी प्राधिकरण श्री संघाचे अध्यक्ष सुभाष जी ललवाणी यांनी उपस्ऱ्थित मान्यवरांचे स्वागत केले. दिलीपजी चोरडीया यांनी प्रास्तविक केले. सौ शारदा चोरडीया यांनी सुत्र संचलन केले. प्रा अशोक पगारिया यांनी सकल समाजाच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. पुजा भंसाळी यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात मंजु संचेती यांनी सादर केलेल्या नवकार मंत्रा ने झाली. ज्येष्ठ नागरिक संघाचे पुर्व अध्यक्ष सुर्यकांत मुथीयान यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रायजकत्व आकुर्डी निगडी प्राधिकरण श्री संघाकडे होते.
जवाहर मुथा, नेनसुख मांडोत, राजेंन्द्र छाजेड, विजय गांधी, सचिन गांधी, मोतीलाल चोरडीया , सुर्यकांत मुथीयान , अशोक मंडलेचा, उमेश भंडारी हिरालाल लुणावत आदिंनी आयोजनात मोलाची मदत केली या आढावा बैठकीला पिंपरी चिॅचवड स्थित सर्व श्री संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी, प्रा अशोक पगारिया, सागर जी साखला यांच्या सह किमान अडीचशे नागरीक उपस्थित होते. श्री संघाच्या वतीने संघाध्यक्ष सुभाष जी ललवाणी व वरिष्ठ श्रावक व पुर्वाध्यक्ष कांतीलालजी मुनोत व विश्वस्तांच्या शुभ हस्ते सन्मानीत करण्यात आले.