Sagevaani.com /जालना: आपल्याला प्रत्येकाला भगवंतांनी दोन डोळे, दोन हात दिले आहेत, तसेच भाऊबीजेचे आहे. भाऊ बीजेला अनन्य साधारण महत्व आहे. भाऊ आणि बहिणींचं नातं हे नेहमीसाठीच अतूट असते, तसंच नातं अांपणही ठेवायला हवं, असा हितोपदेश साध्वी प. प. सत्यसाधनाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या.
यावेळी पुढे बोलतांना साध्वी प. प. सत्यसाधनाजी म. सा. म्हणाल्या की, प्रत्येकाला भगवंतांनी दोन डोळे, दोन हात दिले आहेत, तसेच भाऊबीजेचे आहे. भाऊ बीजेला अनन्य साधारण महत्व आहे. भाऊ आणि बहिणींचं नातं हे नेहमीसाठीच अतूट असते, तसंच नातं अांपणही ठेवायला हवं. पोर्णिमेचा चंद्र जस- जसा मोठा असतो, तसंच हे नातं असतं, प्रत्येक पर्व वर्षातून एकवेळ येतं पण भाऊ- बहिणींच्या नात्याचा सण हा वर्षातून दोनदा येतो.
श्रावण आला की, प्रत्येक स्त्रीला आपलं माहेर गाठावंस वाटतं, असे सांगून त्यांनी आजच्या दिवसाबद्दल विविध उदाहरणाव्दारे इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन करुन सर्वांचे आभार मानले.