जालना : हमारी प्रार्थना निरंतर चल रही है। यह चक्कर काटकर आगे बढ रहे है!! परंतु एवढ्यावरच आपले समाधान आहे काय? तर मुळीच नाही, म्हणूनच भगवंतावर श्रध्दा ठेवा, एक ना एक दिवस तरी तो आपल्या मदतीस धावून आल्याशिवाय राहणार नाही, असा हितोपदेश साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती.
ये जीवन में सावन आयेगा, खुशियोंसें जीवन फुलेगा!! या गितावर आधारीत पुढे बोलतांना साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, हमारी प्रार्थना निरंतर चल रही है। यह चक्कर काटकर आगे बढ रहे है!! परंतु एवढ्यावरच आपले समाधान आहे काय? तर मुळीच नाही, म्हणूनच भगवंतावर श्रध्दा ठेवा, एक ना एक दिवस तरी तो आपल्या मदतीस धावून आल्याशिवाय राहणार नाही, अनंत उपकारी प्रभूंची वाणी आपल्याला ऐकवितांना आम्हालाही बरेच काही शिकायला मिळते. आपण आपल्या शरीराची रक्षा करतो परंतू आत्माची रक्षा कोण करणार? मुंगी सुध्दा आपल्या मंजीलपर्यंत पोहचण्यासाठी ती सुध्दा बिळ शोधते, त्याचप्रमाणे आपण सुध्दा बंगला आदी प्रकारचे म्हणजे बीळ तयार करतोच ना! तशाच प्रकारे मनुष्य भव के अंदर बील तयार करते हो! मुंगीसारखं आपलं जीवन आहे. परंतू एक वार्याची झुळक येते आणि तो बंगला नेस्तानाबूत होतो. परंतू आत्म्याला परमात्मा बनण्याची ताकद आपल्यात आहे, आश्यकता आणि इच्छा ! आवश्यकता ही मर्यादीत असते. तर इच्छा ही अनंत प्रकारची असू शकते. आवश्यकता ही केव्हाही पूर्ण होऊ शकते परंतू इच्छा मात्र पूर्णत्वास जात नाही, असे सांगून साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी आपल्या प्रवचनातून आत्मदर्शनाबद्दल इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.